स्वप्नं ना दिसे आता

2:30:00 PM

उशीर झाला आता, वेळ गेली निघून.
कालचे ते स्वप्न, दिसत नाही आज चुकून.

का रे मला दिलास विश्वास?
का रे बांधलेस हे खोटे पूल?
जर का तुला माहित होते सर्व काही
तर का नाही सांगितलेस तू मलाही.

तुझ्यासाठी घेतली आहे मी झेप.
काळ वेळ विसरून जीव केला होता एक.
फक्त जर खेळच करायचा होता तुला,
तर का निवडलस तू खेळगडी म्हणून मला?

अंधाऱ्या अश्या खोलीत कोंडून आहे मी.
सावलीतच सापडतो मला उजेडही.
बाहेर येण्यासाठी जरी का म्हणलं की मी उठीन.
त्या मनाला समजावणे जाते फार कठीण.

हे दु:खं नाही सहन होत अजून
अगदी मूठभर ताकत उरली आहे, अगदी मोजून.
हे तर आयुष्य गेले आता निघून 
बघ, जमलं तर भेटू पुढच्या जन्मी चुकून.

उशीर झाला आता, वेळ गेली निघून.
कालचे ते स्वप्न, दिसत नाही आज चुकून.

0 comments