तू सांगितलं म्हणून

3:35:00 PM

कुणाचच कसं ऐकत नाही?
नेहमीचीच तक्रार.
हे नाही आवडत, ते नको
हे असं नाही तसं हवं
सगळेच हातापाई यायचे
पाहून हा प्रकार.

आमचा बंड्या फार फार हट्टी,
आणि हो, खूप उद्धत.
लहान-मोठा कुणीही न बघता
देतो उत्तरं उलट.
आई वडील आजी आजोबांसमोर
रेटते बघा कशी जीभ सट-सट.

पण मग तू आलीस
का आलीस तू?
मनमानी सगळीच बंद झाली
मी-मी माझं-माझं सोडून
हो का? बरं-बरं. नक्की अगदी लगेच.
हे सगळं झालं सुरु.

सगळच बदललं नाही का?
मलाच माझा विश्वास बसत नाही.
शांतं झालो सुखी झालो
आपला सोडून इतरांचा विचार करू लगलो.
विनयशील, अभ्यासू, प्रौढ सगळं काही झालो
आणि हो, जवाबदारही.

प्रश्ण पडला की तुला विचारायचो
उत्तर मिळालं की तुला सांगायचो.
इतके वर्ष का नाही पडले प्रश्ण.
खुळा होतो की काय मी?
बहुदा चार भिंतीतच वाढलेलो
तेवढ्यातच जगायचो, तेवढ्यातच वहायचो.

तू सांगितलस म्हणून मी आहे.
तू सांगशील, मी ऐकेन,
माझा प्रश्ण नेहमी असाच सुटेल.
कशाची चिंता नाही, कुणाचीच पडली नाही.
तुझाच आदर, तुलाच सन्मान हे पाहुन
इतरांना मी पुन्हा पूर्वीचाच बंड्या वाटेन.

पण आता तू सांगत नाहीस,
आणि जरी तू सांगत असशील.
तरी मी ऐकत नाही.
पुन्हा मी नुसताच उर्मट आणि नुसताच जिद्दी.
पण ना, हे विसरून पुन्हा एकदा सांग मला,
म्हणजे कदाचित मीही ऐकेन, आणि तुही सांगशील.

0 comments