जा गं जा आता
वेळ झाली आहे गाडीची
तुला थांबवण्यासाठी माझ्यात
शक्ती नाहीए काडीची
पूस ते ओले डोळे
थोडी हस ना अशी
माझ्या चेहर्यावरचे हास्य टिकवायला
जमवतो आहे हिम्मत कशीबशी
अजुन दोन क्षण थांबवून
काय मिळवणार आहे आपण तसे
पुन्हा भेटण्याचे व मेसेज करायचे
घेणार केवळ पोकळ वसे
मी घरी जाउन रडणार
तू सुद्धा कदाचित रडशील
तुझ्या-माझ्या या प्रकरणात
पुन्हा तू अडकशील
त्यापेक्षा हेच बरे
की निश्चय घे मला सोडण्याचा
सगळ्या आठवणी, सगळी बंधने,
सगळं काही तोडण्याचा
नको करूस फोन आता
एवढी नको ती काळजी
मी सावरून घेईन स्वतःला
आता नाहीए बाळ मी
तुझी छोटीशी खूणसुद्धा
नेते मला स्वप्नांच्या जागी
पुन्हा स्वप्न तुटताना बघण्याची
नाहीए गं आता क्षमता माझी
तर सोड गं आता माझा हाथ
आणि तोड ती awkward मिठी
तू माझी नसलीस तरी
जगीन मी फक्त तुझ्यासाठी