अरे, कुणाला सांगू?
कुणाला बोलून दाखवू?
की काय वाटतं मला?
मला बरच काही वाटतं आहे,
पण सांगायची मुभा नाहीये.
आणि मुभा असली
तर समजावून द्यायची संधी नाहीये.
तुम्ही बोलताच,
देतच असता तुमचे थोर उपदेश
पण माहिती असून सुद्धा
तुम्हाला राहवत नाही ना.
अरे, नाही जगायचं मला असं
साधं, सरळ, सुरक्षित, सुरळीत
नाही पटत मला ते.
पण ते तुम्हाला काय समजणार,
तुम्ही ठरलात शहाणे ना,
आणि मी वेडा.
पण तुमचं शहाणपण आणि माझं वेडेपण
हे एकच आहे, हे तुमच्या ध्यानी कसं येणार?
इतकी वर्षं वेडा म्हणूनच काढली की मी
आता अचानक का मला शहाणं करायला निघाला आहात?
तोंड उघडलं की तोंड दिसतं असं म्हणतात,
पण चुप्प बसून सगळं समजून घेण्याऐवजी
उद्धत, उर्मट अश्या पदव्या नक्कीच परवडतील.
पण आपल्याच लोकांना शब्दांच्या बाणांनी मारून
मी तरी काय मिळवू.
म्हणूनच विचारतो, की कुणाला सांगू?
कुणाला बोलून दाखवू?
कुणाला बोलून दाखवू?
की काय वाटतं मला?
मला बरच काही वाटतं आहे,
पण सांगायची मुभा नाहीये.
आणि मुभा असली
तर समजावून द्यायची संधी नाहीये.
तुम्ही बोलताच,
देतच असता तुमचे थोर उपदेश
पण माहिती असून सुद्धा
तुम्हाला राहवत नाही ना.
अरे, नाही जगायचं मला असं
साधं, सरळ, सुरक्षित, सुरळीत
नाही पटत मला ते.
पण ते तुम्हाला काय समजणार,
तुम्ही ठरलात शहाणे ना,
आणि मी वेडा.
पण तुमचं शहाणपण आणि माझं वेडेपण
हे एकच आहे, हे तुमच्या ध्यानी कसं येणार?
इतकी वर्षं वेडा म्हणूनच काढली की मी
आता अचानक का मला शहाणं करायला निघाला आहात?
तोंड उघडलं की तोंड दिसतं असं म्हणतात,
पण चुप्प बसून सगळं समजून घेण्याऐवजी
उद्धत, उर्मट अश्या पदव्या नक्कीच परवडतील.
पण आपल्याच लोकांना शब्दांच्या बाणांनी मारून
मी तरी काय मिळवू.
म्हणूनच विचारतो, की कुणाला सांगू?
कुणाला बोलून दाखवू?